कांदा पात भाजी-मराठीत ( Kanda pat bhaji in Marathi)

आजची रेसिपी आहे कांदा पात भाजी मी पल्लवी पवार आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे “कांदापात भाजी”!

कांदापात भाजी आपल्याला सर्वांना माहीत असलेली पालेभाजी आहे. कांद्याची पात जवळपास वर्षभर उपलब्ध असते. हिवाळ्यात जास्ती प्रमाणात मिळते पातेच्या हिरवागार रंग लगेच आपल्याला आकर्षित करतो, पण अनेकांना ती भाजी आवडत असं नाही परंतु जुन्या लोकांना ती अफलातून आवडते तसेच गावाकडे प्रचंड प्रमाणात आवडून खाल्ली जाते.

कांद्याच्या पातीचा वापर हा फक्त सजावटीसाठीच केला जात नाही तर तिचे आरोग्यासाठी देखील तितकेच अधिक फायदे आहेत. पातीच्या हिरवगार रंग असलेला भाग आणि त्याबरोबरच पांढरा भाग म्हणजेच कोवळा कांदा देखील तितकाच आरोग्यदायी असतो.

कांद्याच्या पातीची विशेष अशी चव असते आपण नेहमी जो कांदा खातो त्याहून कमी तिखट अशी त्याची चव असते. तर चला आजची रेसिपी ला सुरुवात करूया. आजच्या कांदा पात भाजी घरच्या पद्धतीने बनवूया साधी ,सोपी आणि चविष्ट!

बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट

वाटणी: ४ जणासाठी

साहित्य:

१ जूडी कांदा पात (चिरलेली)

३ टीस्पून मूग डाळ (भिजलेली)

२ टीस्पून शेंगदाण्याचा कूट

७-८ लसूण पाकळ्या

१ टीस्पून जिरे

फोडणी साठी

२ टीस्पून तेल

१ टीस्पून मोहरी

५-६ कढीपत्ता

१/२ टीस्पून हळद

२ टीस्पून लाल तिखट पावडर

मीठ चवीनुसार

कृती:

*एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी करतात टाकून परतून घ्या

कांदा पात भाजी

*मग त्यामध्ये लसूण आणि जिरे खलबत्त्यात ठेचून त्यामध्ये एक मिनिटासाठी परतून घ्या.

कांदा पात भाजी

*त्यानंतर भिजलेली मूग डाळ घालून तेलामध्ये साधारणता पाच मिनिट परतून घ्या

कांदा पात भाजी

* डाळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट पावडर टाकून छान असे मिक्स करा.

कांदा पात भाजी

*आता कांदापात स्वच्छ धुतलेली त्यात घालून साधारणता पाच ते सात मिनिट परतून घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालून कांदा पातेला स्वतःची पाणी सुटेपर्यंत मिडीयम गॅसवर परतू द्या.

कांदा पात भाजी

*त्यानंतर अर्थात ग्लास पाणी घालून त्यात शेंगदाण्याचे कूट घालून भाजीला एकजीव करून घ्या.

कांदा पात भाजी

*कांदापात साधारणता मूग डाळ  मऊ होईपर्यंत भाजी मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्या

कांदा पात भाजी

गरमागरम भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

कांद्याची पात भाजीसाठी हा व्हिडिओ पाहू शकता

 

टिप:

१ . कांदा पात भाजी कोरडी पण करू शकतो.  ऑफिस साठी आणि तुम्ही मुलांना डब्यात साठी पण करू शकतात

२. कांदापात मध्ये मूग डाळ टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त शेंगदाण्याच कुट घालून पण भाजी करू शकतात.

३. कांदा पात भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा.

Thank you for Watching Recipe !Have a nice Day 🙏

1 thought on “कांदा पात भाजी-मराठीत ( Kanda pat bhaji in Marathi)”

Leave a Comment